किर्ती आझाद यांची ‘घरवापसी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  २०१५ मध्ये भाजपातून हाकलपट्टी करण्यात आलेल्या खासदार किर्ती आझाद यांनी ( दि. १८ ) क्राँग्रेचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत क्राँग्रेस मध्ये प्रवेश केला. पक्षविरोधी कारवाया केल्याने आझाद यांना भाजप मधून काढण्यात आले हाेते. किर्ती आझाद हे दरभंगा लोकसभा मतदार संघाचे खासदार व भाजपाचे माजी मंत्री होते.

आझाद यांना बिहारच्या दरभंगा लोकसभा मतदार संघातून काॅंग्रेसकडून तिकिट मिळण्याची शक्याता आहे. या मतदार संघामध्ये त्यांची लढत भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत असणार आहे. किर्ती आझाद हे उत्तम क्रिकेटर होते, ते भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. आझाद यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

चार वेळा खासदार असेलेल्या मोहम्मद अली अश्रफ फादमी यांना ३४ हजार मतांनी आझाद यांनी त्यांचा पराभव केला होता. ते बिहारचे माजी मुखमंत्री भागवत झा यांचे पुत्र आहेत. दरभंगा लोकसभा मतदारसंघातून आझाद यांनी लढण्याची उत्सकता दर्शवली आहे. दरम्यान, बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राजद यांनी युती केली आहे. मात्र, त्यांचे जागा वाटप अजून व्हायचे आहे.