मनोरंजन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे आज निधन झाले.मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले आहे.

त्यांनी दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता. शिक्षणाचा आयचा घो, लालबाग परळ, भिंगरी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे किशोर प्रधान यांचे गाजलेले चित्रपट आहेत. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील खट्याळ आजोबा, जब वुई मेटमधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत.

त्यांचे पहिले नाटक १९७०मध्ये आलेले काका किशाचा हे होते. जेव्हा यमाला डुलकी लागते, रात्र थोडी सोंगे फार, घरोघरी मातीच्या चुली, मिळाली परी तरी ब्रम्हचारी, पळता भूई थोडी, संभव-असंभव त्यांची गाजलेली मराठी नाटकं आहेत.

त्यांनी इंग्रजी नाटकातही भूमिका साकारल्या होत्या. किशोर प्रधान यांनी १९८९मध्ये त्यांनी इंग्रजी नाटकांत सुरुवात केली होती. तब्बल १८ इंग्रजी नाटकात त्यांनी काम केले आहे. इग्लंड, अनेरिका, दुबई, मुस्कट, बँकॉक, इंडोनेशिया या देशांमध्ये त्यांनी काम केले आहे. उचला रे उचला, बाप तिचा बाप, डॉक्टर डॉक्टर, मास्तर एके मास्तर, शहाणपण देगा देवा, शेजारी शेजारी, वरचा मजला रिकामा हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या