मोदींनी या क्षेत्रात केले नवीन रेकॉर्ड ; वाचा सविस्तर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर सतत टीका केली जाते तर शिक्षित लोकांमध्ये मोदींच्या बद्दल  प्लस पॉईंट म्हणून त्यांच्या विदेश दौऱ्याकडे पहिले जाते. त्यांनी एका पंचवार्षिक कालावधीत केलेल्या दौऱ्यांची संख्या बघता त्यांनी एक नवा विक्रम रचला असून एका पंचवार्षिक मध्ये ९२ दौरे केल्याने एवढ्या संख्येने विदेश दौरे करणारे मोदी हे भारतातील पहिले पंतप्रधान बनले आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या विदेश दौऱ्याने भारताचे अनेक देशांशी संबंध सुधारण्यास मदत झाली आहे. तर मोदींच्या विदेश दौऱ्यावर झालेला खर्च हा सर्वाना अवाक करून सोडणार आहे.

मागच्या काही दिवसात मोदींच्या या पंचवार्षिक विदेश दौऱ्यांची सांगता झाल्याचे संकेत मिळाले असून आता त्यांच्या पंचवार्षिक कार्यकाळात झालेल्या निवडणूक खर्चाचे तपशील पाहण्यास मिळतात. या खर्चाच्या आणि मोदींच्या दौऱ्यांच्या संदर्भात आता राजकीय विश्लेषक त्याच्या दौऱ्याचे एकूण राजकीय विश्लेषण  मांडू लागले आहेत.

एका पंचवार्षिक मध्ये सर्वात जास्त दौरे करणारे पंतप्रधान 
नरेंद्र मोदींनी  एका पंचवार्षिकमध्ये केलेले दौरे बघता. त्यांनी आजपर्यत झालेल्या दौऱ्याचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ९३ विदेश दौरे केले होते तर मोदींनी आज पर्यंत एकूण ९२ दौरे केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले हे विदेश दौरे हे सर्वात जास्त दौरे असून आज पर्यंत कोणत्याच पंतप्रधानाने एवढे विदेश दौरे केल्याचे उदाहरण भारताच्या राजकीय इतिहास सापडणार नाही.

मोदींनी आज पर्यंत केले एवढे विदेश दौरे 
मोदींनी आजपर्यंत अनेक देशांचे दौरे करून तेथील देशांशी विविध करार केले आहेत. मोदींनी दक्षिण कोरियात जाऊन भारतात मोबाईलच्या कंपनी उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक आणली त्यांच्या हाती सत्ता जाण्याच्या अगोदर देशात फक्त  दोन मोबईल कंपन्या होत्या त्यांचे उत्पन्न हि नगण्य होते परंतु मोदींनी सत्ता हातात घेतल्या पासून आज तगायत भारतात १०० मोबाईल कंपन्या उभारल्या गेल्या आहेत. मोदींच्या परदेश दौऱ्यांचे हे फलित म्हणावे लागेल.

एवढे कोटी रुपये आला खर्च 
मोदींच्या विदेश दौऱ्यांना आजता गायत झालेल्या ९२ दौऱ्यांमध्ये २ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक विदेश दौरे केले आहे.

नरेंद्र मोदी मोडणार इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड 
आजवरच्या राजकीय इतिहासात नरेंद्र मोदी यांनी एका पंचवार्षिक मध्ये ९२ विदेश दौरे केले असून   इंदिरा गांधी यांच्या एकूण कार्यकाळाच्या म्हणजे १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ११३ दौरे केले होते. ती संख्खा गाठण्यासाठी मोदींना फक्त २१ दौऱ्यांची आवश्यकता आहे. इंदिरा गांधी यांनी केलेल्या विदेश दौऱ्याची संख्या मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर सहज मोडू शकतील असे जाणकारांचे मत आहे. तर मोदींच्या कामावर खुश नसणारी जनता त्यांच्या विदेश नीती वर मात्र खुश असल्याचे आपणाला पाहण्यास मिळते.