हे मात्र अतिच झालं ; लक्ष्मीपूजनाला चक्‍क हवेत गोळीबार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अलिकडील काळात कोण काय करेल याचा नियम नाही. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे घडली आहे. शिरोलीचे लोकनियुक्‍त सरपंच शशिकांत खवरे यांनी चक्‍क लक्ष्मीपूजनाला हवेत गोळीबार केला आहे. त्यांनी काल (बुधवार) लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह संध्याकाळी सात वाजण्याच्या सुयमारास डबलबारी बंदूक आणि पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला. हे मात्र अतिच झालं अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतुन येत आहे.

उत्साहाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे सरपंच खवरे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरूध्द शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खवरे यांनी भररस्त्यात हवेत गोळीबार केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. शशिकांत खवरे हे लोकनियुक्‍त सरंपच असल्याने त्यांना परिसरातील नागरिकांचा चांगलाच पाठिंबा आहे. मात्र, त्यांनी काल (बुधवार) केलेल्या हवेतील गोळीबारामुळे त्यांच्याबद्दल चांगलीच चर्चा चालु आहे. परिसरातच नव्हे तर संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खवरेंनी केलेला गोळीबार हा चर्चेचा विषय बनला आहे. गोळीबार करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार 

सर्वत्र लक्ष्मीपूजनाचे फटाके वाजत हाते. त्याचवेळी खवरेंनी डबलबारी बंदूक आणि पिस्तुलामधून हवेत गोळीबार केला आहे. दरम्यान, खवरे यांच्याकडे शस्त्रांचा परवाना असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी अशाच प्रकारची घटना सांगली जिल्हयात घडली होती. त्यावेळी पोलिसांनी कडक कारवाई करून संबंधितांना अटक केली होती. या प्रकरणात नेमक काय होत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.