पाचगणीत पॅराग्लायडींग करताना कोरियन नागरिकाचा मृत्यू

पाचगणी : पोलीसनामा ऑनलाईन – पाचगणी येथे पॅराग्लायडींग करताना डोंगराला ध़डकून जखमी झालेल्या परदेशी नागरिकाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. पाचगणीतून उड्डाण केल्यानंतर अभेपुरी गावाजवळ या नागरिकाला अपघात झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. वाईतील रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरियन नागरिक आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईतून पाचगणीला आला होता. त्याने पाचगणीत येथून उड्डाण केले. त्यानंतर अभेपुरी गावाच्या हद्दीत आल्यावर तेथील एका डोंगराला तो धडकला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी वाई मिशन रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती मिलाताच पोलीस उपअधिक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे आणि कर्मचारी घटनास्‍थळी दाखल झाले.उपचार सुरु असताना या परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला. कोरियन दुतावासाचे अधिकारी वाई येथे दाखल झाले आहेत. तर शवविच्छेदनानंतर शासकिय सोपस्कर पुर्ण करून त्याचा मृतदेह दुतावासाच्य़ा  अधिकाऱ्यांच्या सुपुर्द करण्यात येणार आहे.