कोथळे खून प्रकरण: आरोप निश्‍चितीचा मसुदा उद्या न्यायालयासमोर

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

अनिकेत कोथळे खून प्रकरणीतील आरोपींवर आरोप निश्‍चितीचा सरकार पक्षाचा मसुदा उद्या (ता.16) न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितली. दरम्यान, न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या पुरवणी कागदपत्रांची प्रत आज बचाव पक्षाच्या वकिलांना मिळाली. वाचनासाठी न्यायालयाकडे मुदती मागण्यात आली. ती मंजूर करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e843a1e-d086-11e8-b523-a5571d620047′]
गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत कोथळे मृत्यूकांड प्रकरण घडले होते. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. जबरी चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांना तीन दिवसांची कोठडी मिळाली. त्याच दिवशी रात्री आठ ते नऊच्यासुमारास बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कामटेसह अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक झाली. सीआयडीने तपास करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कामटे याने सातत्याने उद्दामपणाचे कृत्य केले आहे. गेल्या 11 सप्टेंबरच्या सुनावणीतही कामटेने न्यायालयात उद्दामपणा केला. दोषारोपपत्राची न्यायालयाकडे दाखल असलेल्या कागदपत्रांची प्रत मला हवी आहे, अशी मागणी करत त्याने थेट “प्रत बदलली जाईल’ असा संशय व्यक्त केला. त्यामुळे न्यायाधीशांनी कामटे याला चांगलेच फैलावर घेतले होते.

त्यानंतर कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने आणखी पुरावे गोळा केले. त्याचे पुरवणी कागदपत्र दाखल त्यावेळी दाखल करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र पुरवणी कागदपत्रांची प्रत आज बचाव पक्षाच्या वकिलांना मिळाली. त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे मुदतीसाठी अर्ज केला. उद्या (ता.16) सरकार पक्षातर्फे आरोपींवर आरोप निश्‍चितीचा मसुदा न्यायालयासमोर ठेवाल जाणार आहे. त्यानंतर सुनावणी सुरू होईल.

कुटूंबियांची न्यायालयात गर्दी

कामटेसह साथीदारांना आज सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. त्यावेळी त्यांच्या कुटूंबियांची मोठी गर्दी न्यायालय परिसरात होती.