भारत-पाक ताणले गेलेल्या संबधातच कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची सुनावणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुलभूषण जाधव यांना पाकिस्तनाच्या लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या सुनावणीच्या विरोधात उद्यापासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी घेतली जाणार आहे. ‘द हेग’ येथे आंतरराष्ट्रीय नायायालयात या खटल्याची सुनावणी होणार असून १८ ते २१ फेब्रुवारी पर्यत हि सुनावणी सुरु राहण्याची शक्यता आहे. १० सदस्यांच्या पीठासमोर हि सुनावणी केली जाणार आहे.

कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या सुनावणीचे संकेत स्थळाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या खटल्यात जेष्ठ विधिज्ञ हरिष साळवे १८ फेब्रुवारीला भारताची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर मांडणार आहेत. तर १९ फेब्रुवारीला खावर कुरेशी पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत. २० फेब्रुवारी भारताच्या वतीने हरिष साळवे प्रतिवाद करणार आहेत. तर २१ तारखेला खावर कुरेशी पाकिस्तानची या खटल्यातील अखेरची भूमिका मांडणार आहेत.

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेने कुलभूषण जाधव यांना इराण मध्ये अटक केली होती. भारताचा गुप्तहेर असल्याचे सांगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारत पाकिस्तान संबंध गुरुवारी काश्मीरच्या पुलवामा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे कमालीचे ताणले गेले आहेत. अशा तणावतच कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची सुनावणी आली आहे. त्यामुळे या खटल्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.