हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन

खेड : पोलीसनामा ऑनलाईन

राजगुरूनगर (ता.खेड) शहरातील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कामाची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d1776dc-c3f9-11e8-8d8d-59cc81bfa92e’]

राजगुरूनगर शहरातील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन ही संस्था निराधारांसाठी आधार देण्याचे काम करत असुन तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेरणादायी वक्ते मा.श्री.शशांक मोहिते (बारामती ) यांचे “बदलुया दशा देऊया नवी दिशा” या विषयावर आनंदी आनंद मंगल कार्यालय राजगुरूनगर येथे सोमवर दि.१ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५:३० वाजता व्याख्यान होणार आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee23f164-c40a-11e8-90e9-893599a8230a’]

चितगिरी दरोडा प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन

या कार्यक्रमाला सर्वच क्षेञातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असुन राजगुरूनगर शहर व तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात