ताज्या बातम्या

पुणे शहरातील ‘या’ परिसरात बिबट्याचा वावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत गावात बिबट्याचा वावर, बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना आपण अनेकदा पाहिल्या असतील पण आता बिबट्या आणि जंगली प्राणी शहरी भागात देखील येऊ लागेल आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एनडीए) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे याबाबतची माहिती नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली आहे. ‘एनडीए’ प्रशासनानेही तेथे वास्तव्याला असणाऱ्या कॅडेट्स, शिक्षक आणि अधिकाऱ्यांना सायंकाळनंतर काही ठिकाणी एकट्याने न फिरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या भागात बिबट्याचे दर्शन 
एनडीए’च्या फिल्टरेशन प्लांट, त्रिशक्ती गेट, पाषाण गेट, लाँग रेंज, गोल्फ कोर्स या भागात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असल्याचे ‘एनडीए’ प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नय़े, यासाठी कॅडेट्स, शिक्षक आणि अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘एनडीए’त सूर्यास्तानंतर एकटे फिरू नये, अंधारात मुलांना एकटे सोडू नका, सोबत मोठी व्यक्ती असल्याशिवाय रात्री बाहेर जाऊ देऊ नका अशा सूचना अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्या आहेत.

या सोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरांच्या आजूबाजूची पाहणी करण्यासोबतच तेथे रात्रीच्या वेळी पुरेशा प्रमाणात प्रकाशव्यवस्था करण्याची काळजी घेण्याबाबत सांगितले आहे. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती तातडीने सुरक्षा यंत्रणेकडे द्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे. या प्रकारामुळे ‘एनडीए’ आणि ‘एनडीए’ प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एनडीए परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शुक्रवारी वनाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. नागरिकांनी बिबट्या दिसल्याचे सांगितले. रात्री उशिरा एकट्याने फिरू नका आणि पाळीव जनावरांना मोकळे सोडू नका, अशा सूचना आम्ही नागरिकांना दिल्या आहेत. या भागात वनक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असू शकतो. पण, बिबट्याने अद्याप कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही.

‘या’ वरिष्ठ आय.पी.एस (Sr. IPS) अधिकाऱ्याने केली मल्ल्या, नीरव मोदीला पळून जाण्यास मदत ?

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या