आता येतोय १६ डोळ्यांचा स्मार्टफोन 

वृत्तसंस्था – अनेक स्मार्टफोन कंपन्या आता ३ रिअर कॅमेरा असलेले स्मार्टफोन सादर करत आहेत. सध्या  १६ लेन्स असलेला रिअर कॅमेरा सेटअपवाल्या फोनवर सध्या संशोधन सुरु आहे. दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजीला नुकतेच युनायटेड स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून (USPTO) १६ लेन्स रिअर कॅमेरा सिस्टिमसाठी पेटंट मिळाले असल्याची चर्चा आहे.

 १६ लेन्सच्या स्मार्टफोनमध्ये असतील हे फिचर –

उत्तम दर्जाच्या फोटोंसाठी १६ लेन्सवाला फोन लाँच करण्यात येणार आहे. एलजीच्या फोनमध्ये देण्यात येणाऱ्या १६ लेन्ससोबत फोटो काढता येतील अशी आशा आहे. या फोनमध्ये युजर्सकडे वेगवेगळ्या फोकल लेंथसह फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. १६ लेन्स कॅमेरा सिस्टिमसह निश्चितपणे वाइड फोकल लेंथ पर्यायासह चांगली पोर्ट्रेट दृश्य घेता येतील. तसेच यातील  तंत्रज्ञान 3D चित्र हलविण्याची परवानगी देईल आणि प्रत्येक शॉटसह घेतलेल्या अतिरिक्त डेटामुळे फोटोंमधील ऑब्जेक्ट्स बदलणे देखील सोपे होईल.युजर्सने एखादा फोटो क्लिक केल्यानंतर तो एडिटही करता येणार आहे. कॅमेरा सिस्टिममध्ये वाइड-अँगल, फिशआय, टेलिफोटो आणि मैक्रो दृश्य घेता येण्याची शक्यता आहे.

 सॅमसंगने अलीकडेच आपला ४ कॅमेरा असलेला स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए९ लाँच केला.सध्या सॅमसंग गॅलेक्सी ए९ जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात  ४ लेन्सवाला  कॅमेरा सिस्टिम आहे.