लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या महिलेला सुरक्षाकवच ; मिळणार ‘हा’ अधिकार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – तरूणाई सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करीत आहे. पण लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये  राहणाऱ्या महिलांना बऱ्याचदा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो पण आता अशा महिलांकरिता सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेली महिला आपल्या जोडीदाराकडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगी मागू शकते, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.
केवळ शारीरिक, मानसिक नव्हे तर आर्थिक प्रकरणातही महिलेचा छळ केल्याप्रकरणी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलादेखील पोटगी मागू शकतात. जोडीदाराविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण

एका महिलेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना मुलाला जन्म दिला. त्या महिलेला पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले. या आदेशाविरोधात जोडीदाराने झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने फौजदारी कायद्याअंतर्गत विवाह झालेल्या महिलांना पोटगी मिळण्याचा अधिकार असल्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सदर महिलेचा विवाह झाला नसला, तरी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. घरगुती हिंसाचारामध्ये आर्थिक प्रकरणांचाही समावेश आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नक्कीच लिव्ह -इन -रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

‘त्या’ मुलीच्या सुटकेसाठी मागितली होती ५० लाखांची खंडणी 

लिव्ह – इनरेलशनशिप आणि जगभरातील कायदे

ह्या जगात आणखी असे कितीतरी देश आहेत ज्यांनी अजूनही ह्याला मान्यता दिलेली नाही. तर काही देशांनी हे मान्य देखील केलं आहे. त्यामुळे कुठल्या देशात लिव्ह इन रिलेशनशिप बाबत काय कायदे आहेत जाणून घेऊया
संयुक्त राष्ट्र अमेरिका :
१९६० च्या आधीपर्यंत अमेरिकेत लिव्ह इन रिलेशनशिप अशक्य होतं. त्यावेळी अविवाहित जोडप्यांना घर किंवा खोली मिळणे खूप कठीण असायचं. त्यानंतर हळूहळू ह्यात बदल झाला आणि अमेरिकेने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली. आणि आज तर अमेरिकेत हे कॉमन झालं आहे.
नॉर्वे :

नॉर्वेमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप खूप कॉमन आहे. एवढचं नाही तर नॉर्वेत जर कुठलं जोडपं विवाह न करता ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सोबत राहत असेल तर त्यांना मुलांना जन्म देण्याचा देखील अधिकार आहे. नॉर्वेत अश्या नात्यासाठी ते लिव्ह इन करार देखील करू शकतात.
रशिया :
रुस ह्या देशात अनेक जोडपे हे लिव्ह इन ला पसंती देतात. लिव्ह इन नंतर त्यांना विवाह करण्याची परवानगी आहे. इथले जोडपे लग्नाआधी सोबत राहतात आणि त्यानंतर ते स्वतःचा विवाह नोंदणीकृत करतात. ह्या अंतर्गत चर्चमध्ये सामुहिक विवाह करवले जातात.
ऑस्ट्रेलिया :

२००५ साली झालेल्या एका सर्वेनुसार ऑस्ट्रेलियातील २२ टक्के जोडपे हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर २०१८ साली विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी ७८ टक्के जोडपे हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे होते.
यूरोप :
युरोपमधील अनेक भागांत लिव्ह इन रिलेशनशिप कॉमन आहे. इथे केवळ तरुणच नाही तर प्रत्येक वयातील जोडपे लिव्ह इन मध्ये राहतात. येथे १९२६ नंतर लिव्ह इन रिलेशनशिपला उघडपणे स्वीकारले गेले.
आता असे काही देश बघुयात जिथे आजही लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नाही. 
नेपाल :
नेपाल ह्या शेजारच्या देशात विवाह न करता सोबत राहणे अमान्य आहे. पण इथल्या मोठ्या शहरांत हळूहळू हा ट्रेंड जोर धरतो आहे. पण ते हे सामाजिक स्तरावर उघड करू शकत नाही. तिथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जोडपे ही गोष्ट इतरांपासून लपवून ठेवतात.
 बांग्लादेश :
बांगलादेशमध्ये देखील लिव्ह इन रिलेशनशिप चुकीची मानल्या जाते. येथे लग्नाशिवाय एकत्र राहणे सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर अमान्य आहे. जर इथे कुठलं जोडपं सोबत राहत असताना दिसून आले तर त्यांना घर आणि विद्यापीठातून हाकलून लावण्यात येते.
इंडोनेशिया :
इंडोनेशियात देखील लिव्ह इन पूर्णपणे अमान्य आहे. २००५ साली एक इस्लामी दंड संहिता आणल्या गेली, ज्या अंतर्गत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना दंड म्हणून दोन वर्षांचा कारावास देखील भोगावा लागू शकतो.
पोलंड :

पोलंड हे युरोपातील इतर क्षेत्रांपैकी अगदीच वेगळं आहे. जिथे एकीकडे युरोपातील इतर क्षेत्रांत लिव्ह इन रिलेशनशिप कॉमन आहे तिथेच पोलंडमध्ये हे अमान्य आहे. पोलंड हे परंपरा आणि संस्कृती मानणारे शहर आहे. म्हणून येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे अमान्य आहे.
आपल्या देशात भलेही लिव्ह इन रिलेशनशिपला न्यायिक मान्यता दिली गेली असली तरीही अजूनही अनेक देशांत हे अमान्य आहे.