राजकीय

सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दगडफोड्या निवडणूक लढवणार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका चहावाल्याला देशातील जनतेने पंतप्रधान पदावर बसवले मी तर दलित कुटुंबातील दगडफोड्या आहे. मला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोक निश्चित विजयी करतील असा आत्मविश्वास पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडू घोडके यांनी वर्तवला आहे. ते वडार समाजाचे नेते आहेत. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असून आपला विजय निश्चित होणार आहे म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवाचे तोंड पहाण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी असे शिंदे यांना आवाहन दगडू घोडके यांनी केले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्यांनी आज मंगळवारी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा इशारा दिला आहे.

१९९९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला हि दगडू घोडके यांनी उमेदवारी केली होती. परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक नक्कीच जिंकणार आहे असे दगडू घोडके यांनी म्हणले आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचा या अगोदर या मतदारसंघात पराभव झाल्याने त्यांनी दुसरा मतदारसंघ निवडावा असे घोडके यांनी म्हणले आहे. आपण निवडणूक लढणार हे निश्चित करणाऱ्या घोडके यांनी त्यांचा पक्ष मात्र अद्याप जाहीर केला नाही.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या