गावठी दारूच्या भट्ट्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा

लोणी काळभोर : हनुमंत चिकणे : पोलिसनामा ऑनलाइन – उरुळी कांचन (ता. हवेली ) परिसरातील अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता. १५ ) संध्याकाळी छापा टाकून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन नष्ठ करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

याप्रकरणी राधेशाम उर्फ राजु हरीराम गोयल व संगिता संतोष खलसे (रा.दोघेही, उरूळी कांचन, पांढरस्थळ ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन हद्दीतील पांढरस्थळ परिसरात खूप दिवसापासून गावढी दारू तयार होत असल्यची माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती.

याप्रमाणे पोलिसांनी गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यावर छापा टाकून उध्वस्त केल्या. या कारवाईत शेकडो लिटर रसायन नष्ट करण्यात आले. गावठी हातभट्टी केंद्रावर छापेमारी करून गावठी दारू नष्ट केल्याने अवैधरित्या गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र महानोर, चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार व पोलीस कर्मचारी यांनी हि कारवाई केली