एटीएममध्ये (ATM) भरण्यासाठी चालविलेले ३६ लाख लुटले

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी चालविलेली तीस लाख रुपयांची रोकड संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात बंदुकीच्या धाकाने लुटली.

संगमनेरच्या कार्पोरेशन बँकेतून २६ लाख आणि बडोदा बँकेतून १० लाख असे ३६ लाख रुपये काढून एका खासगी कंपनीचे एटीएम चालविणारे  कर्मचारी मोटार सायकलवरून जवळे कडलग ते वडगाव लांडगा रस्त्याने  चालले होते. वडगाव लांडगा येथील शाखेत असणार्‍या एटीएममध्ये भरणा करण्यास जात असताना वडगाव लांडगा शिवारातील कालव्याजवळील निर्जन स्थळी एका वाहनातून आलेल्या लुटारूंनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याजवळील ३६ लाखांची रक्कम लुटून पोबारा केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक अश्विनीताई टिळे, हवालदार  परमेश्वर गायकवाड, लक्ष्मण औटी, बाबा खेडकर यांचे पथक तात्काळ वडगाव लांडगा येथील घटनास्थळी गेले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. ग्रामस्थांकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली.