प्रभू रामचंद्र आले स्वप्नात…आणि मुस्लिमचा झाला हिंदू

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला हिंदू धर्म स्वीकारायला सांगितला असा दावा असा दावा करत एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह धर्मांतर करुन हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. माझे पूर्वज हिंदू होते पण धर्मांतर करण्यास त्यांना भाग पाडल्यामुळे ते मुस्लिम बनले होते असा दावा या व्यक्तिने केला आहे.विशेष म्हणजे धर्मपरिवर्तनानंतर पूर्वीचा शहजाद आता संजू राणा झाला आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. संजू राणा  उत्तर प्रदेशात शामली येथील रहिवासी आहे.
काही शतकांपूर्वी परकीय आक्रमक इथे आले. त्यांनी माझ्या पूर्वजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला. मी आता माझ्या मूळाकडे परतत आहे असे संजू राणाने सांगितले. प्रभू रामचंद्र मागच्या १५-२० दिवसापासून माझ्या स्वप्नात येत होते. ते मला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगत होते असा खुलासाही त्याने केला आहे. मी आता माझ्या मूळाकडे परतत आहे असे संजू राणाने सांगितले. असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
हा निर्णय मी स्वेच्छेने घेतला
“धर्मांतरासाठी कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेचा माझ्यावर दबाव नव्हता. स्वेच्छेने मी हा निर्णय घेतला. माझे कुटुंबिय सुद्धा या निर्णयाने आनंदात आहेत असे संजू राणाने सांगितले. भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते हे माझ्या समाजाला कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याची मला चिंता लागून राहिली होती” असे संजूने सांगितले.
काही लोकांकडून मला धमक्याही मिळाल्या
काही लोकांकडून मला धमक्या मिळाल्या होत्या. माझे काका सुद्धा माझ्या धर्मपरिवर्तनाच्या निर्णयाविरोधात होते असे संजू राणाने सांगितले. मला जे भय वाटत होते त्यापेक्षा परिस्थिती वाईट होती असेही तो म्हणाला. मला आता माझ्या मुलांची चिंता लागून राहिली आहे असे संजू राणाने सांगितले.  राणाने पोलिसांशी संपर्क साधून संरक्षणाची मागणी केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन मी माझा जीव वाचवल्याचे त्याने उघड केले. संजूच्या जीवाला धोका असल्याबद्दल आम्हाला अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही असे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले.
जाहिरात