प्रियकराकडून प्रेयसीवर चाकुने सपासप 16 वार करून विष प्राशन

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेयसीच्या कुटूंबियांनी लग्‍नास विरोध दर्शविल्याने प्रेमात वेडा झालेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकुने सपासप 16 वार करून स्वतः विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी चिमुरपासुन 10 किलो मीटर अंतरावर असलेल्या नंदारा येथे घडली. घटनेची माहिती मिळताच चिमुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन दोघांची प्रकृती चिंताजनक असून प्रेयसीला नागपूर येथे हलविण्यात आल्रूाची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चेतन सुरेश गजभे (22) असे विष प्राशन केलेल्याचे नाव आहे. तो नंदारा गावचा असून चिमूर येथील नेहरू ज्युनियर महाविद्यालयात शिकत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासुन त्याचे एका 18 वर्षीय तरूणीशी प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने तरूणीच्या आई-वडिलांकडे तिच्या लग्‍नाची मागणी घातली मात्र त्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चेतन हा गेल्या काही दिवसांपासुन तणावात होता. शिक्षण घेवुन परतणार्‍या तरूणीला चेतनने गाठले आणि खिशातील धारदार चाकु काढला. त्याने कुठलाही विचार न करता तिच्यावर सपासप 16 वार केले. तरूणीसोबत असलेल्या इतर मुली घाबरून गेल्या. त्यांनी आरडा-ओरडा सुरू करून गावाकडे धाव घेतली. काही क्षणातच घटनास्थळी गर्दी जमा झाली. गावकर्‍यांनी तात्काळ घटनेची माहिती चिमूर पोलिसांना मोबाईलवरून दिली.

दरम्यान, चेतनने निराश होवुन स्वतः विष प्राशन केले. पोलिस घटनास्थळी पोहचले. दरम्यान, चेतन आणि त्याच्या प्रेयसीला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलो. तरूणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.