पुण्यात सिलेंडरचा स्फोट

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – वारज्यातील राजयोग सोसायटीमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेत पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे.

छाया वचकवडे आणि ज्ञानेश्वर वचकवडे अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वारज्यातील परिसरातील गितांजली कॉलनीमध्ये राजयोग सोसायटीत वचकवडे कुटुंबिय तीन मजली इमारतीमध्ये राहण्यास आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सायंकाळी घराजवळच बाहेर गेले होते. त्यानंतर ते घरी परतले आणि वीज सुरु केली. तेवढ्यात मोठा स्फोट झाला. त्यात दोघेही भाजले आहेत. मोठा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांनी तेथे येऊन त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. परंतु स्फोटाच्या आवाजाने मात्र परिसरात एकच गोंधळ उडाला.