राजकीय

कोल्हापूर – सातारा लोकसभेचे चित्र स्पष्ट तर माढ्याचे तळ्यात मळ्यात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापुरात पक्षांतर्गत वाद मिटवून कामाला लागण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या हायकमांड कडून आल्या आहेत. तर साताऱ्यात हि उदयनराजेंचे तिकीट हे जवळपास फिक्स मानले जाते आहे. परंतु विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पायाला मात्र राष्ट्रवादीने पायगुत्ता अद्याप कायम ठेवले आहे. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षांतर्गत बंडाळी उघड दिसू लागली असून बबन शिंदे गट, दीपक साळुंखे गट, बागल गट या गटांच्या पुढे राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे घोडे रुतून बसले आहे. त्यामुळे हि विजयसिंहांचे तिकीट राखून ठेवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला माढा मतदार संघात उभा राहण्याचा धडा कोणाचा होत नाही म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या उमेदवारीचा विडा उचलला होता आणि मोदी लाटेत शरद पवारांची बूज राखली होती. मात्र  या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विजयसिंहांच्या विरोधात  पक्षांतर्गत सुप्त हालचालींना सुरुवात झाली आहे. कधी बारामतीच्या पवार परिवारातील नाव चर्चेत येत आहे तर कधी माजी भाप्रसे अधिकारी  प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत येते या सर्व गनिमी काव्यात विजय कोणाचा होणार हे सांगणे आता अधिकच कठीण बनत चालले आहे. अशात मोहिते पाटील समर्थकांच्या चिंतेत वाढ होताना दिसते आहे.

निवडणुका जवळ येऊ लागताच माढ्याचे तिकीट कोणाला मिळणार या बाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. प्रभाकर देशमुखांचा माढ्यात जनसंपर्क जरी वाढीस लागला असला तरी त्यांना तिकीट दिले गेले तर माढा,सांगोला, माळशिरस ,करमाळा या सोलापूर जिल्ह्याच्या भागातील लोक त्यांना स्वीकारतील का या बद्दल शाशंकता आहे.कारण प्रभाकर देशमुख सातारा जिल्ह्यातील असून या जिल्ह्यातील फक्त दोनच विधानसभा मतदार संघ हे माढा लोकसभा मतदार संघात समाविष्ट होतात. तर हाच धोका ओळखून शरद पवार प्रभाकर देशमुखांना बॅकफूटवर ठेवतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मग पवार घराण्यातील उमेदवार दिला जाणार कि विजयसिंहांना उमेदवारी दिली जाणार कि अन्य कोणत्या तरी गटाला रणांगणात उतरवले जाणार या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे. तूर्तास या मतदारसंघात उत्कंठा कायम राहणार आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या