मनोरंजन

#MeTo : आलोक नाथ यांच्या विषयी माधुरी दीक्षित म्हणाली… 

मुंबई : वृत्तसंस्था – .काही महिन्यापूर्वी मीटू मोहिमे अंतर्गत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर गैरवर्तनाचे आरोप झाले होते. बॉलिवूडमध्ये संस्कारी बाबू अशी ओळख असणारे अलोकनाथ यांच्यावरही या मोहिमेंतर्गत आरोप झाले होते. त्यामुळे बॉलिवूडमधल्‍या अनेक कलाकारांना धक्‍का बसला होता. या आरोपानंतर आलोक नाथ यांच्‍याबद्‍दल अनेक कलाकारांनी आपले मत, प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यावर आता ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने प्रतिक्रिया दिल्या आहे.

अलोक नाथ यांच्‍याविषयी  माधुरी म्हणाली, अलोक नाथ यांचे ‘हे’ नवे रुप मला माहीत नव्‍हते, ‘अलोक नाथ यांचे नाव मीटू अभियानात आल्‍यामुळे मला धक्‍का बसला होता. त्‍यांचा हा नवा चेहरा माहिती नव्‍हता, असे माधुरीने म्‍हटले आहे. त्‍याचबराबेर, माधुरीच्या ‘गुलाब गँग’ चित्रपटाचे दिग्दर्शक सौमिक सेन यांच्‍यावरही असभ्‍य वर्तन केल्‍याचा आरोप लागला होता. सौमिक सेनचे नाव मी टूमध्‍ये आले. या गोष्‍टीमुळे मला खूप दु:ख झाले. या गोष्‍टी खूपच धक्‍कादायक होत्‍या. अशा गोष्‍टी ज्‍यावेळी समोर येतात, त्‍यावेळी तुम्‍ही त्‍या व्‍यक्‍तीला कितपत ओळखता आणि ती व्‍यक्‍ती कशी आहे, या दोन वेगवेगळ्‍या गोष्‍टी आहेत, असे माधुरी म्‍हणाली.

‘हम आपके हैं कौन’, ‘जमाई राजा’, ‘हम तुम्हारे हैं सनम’ यांसारख्‍या अनेक हिंदी चित्रपटांमध्‍ये अलोकनाथ आणि माधुरी दीक्षित यांनी एकत्र काम केले आहे. या मीटू मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी शोषणाविरोधात आवाज उठवला होता.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या