गॅस सिलिंडरच्या स्फोटात १५ झोपड्या जळून खाक

महाबळेश्‍वर;पोलिसनामा ऑनलाईन: महाबळेश्वर येथील एका प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या  एका झोपडीत अचानक गॅस सिलींडरचा मोठा स्फोट झाला.या स्फोटामुळे लगतच्या अन्य झोपड्याही पेटल्या. स्फोटामुळे लागलेल्या आगीत जवळपास 15 झोपड्या भस्मसात झाल्या आहेत .
झोपडीत कोणीही नसल्याने हा प्रकार लवकर उघडकीस आला नाही.त्यामुळेच आगीने रौद्र रूप धारण केले आणि जवळील १५ झोपड्यांचे यात नुकसान झाले. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने आग वाढतच होती. नियंत्रण आणत असतांना अन्य झोपडीतील सिलिंडरचा स्फोट होत होता. त्याने आणखी आग भडकत होती. अग्निशामक दलाच्या जावाणांनी वेळीच घटनासथळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. झोपडीत कोणी नसल्याने जीवितहानी टळली. घटनास्थळी महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील पाहणी केली आहे.