…तर मी शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने आपणाला माढ्याची जागा सोडल्यास आपण तेथून निवडणूक लढून शरद पवार यांना पराभूत करू असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केल्या आहेत. भाजपने जर माढ्याची जागा रासपला सोडली तर महाराष्ट्र केसरी पेक्षा मला हिंद केसरी व्हायला जास्त आवडेल असे दुग्धविकास आणि पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी म्हणले आहे.

२००९ साली हि शरद पवार यांच्या विरोधात महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी दुसऱ्या स्थानावर भाजपचे सुभाष देशमुख तर तिसऱ्या स्थानावर महादेव जानकर होते. राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाचे महादेव जानकर हे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांचा पक्षाचे निवडणूक चिन्ह हे कपबशी आहे.

मी बारामती आणि माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी एनडीएकडे अर्ज केले आहेत. त्या अर्जावर ते विचार करून मला दोन्ही पैकी एक मतदारसंघ देतील असे जानकर म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जरी बारामतीत कमळ फुलवण्याची घोषणा केली असली तरी ते मला पाच मिनिटातच मतदारसंघ सोडायला तयार होतील असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमालीचे घटवण्यात महादेव जानकर यशस्वी झाले होते. टपाल मतदानाच्या फेरीत तर महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आघाडी घेतली होती. मात्र महादेव जानकर यांना विजयाने हुलकावणी दिली होती.