कोलकातामध्ये पूल कोसळला, ६ जखमी; अनेक जण अडकल्याची भीती

कोलकत्ता : वृत्तसंस्था

कोलकत्ता येथील माजेरहाट पूल कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या पुलाचा एक भाग कोसळला असून त्या पुलाखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाखाली अनेक गाड्या उभ्या होत्या त्यापैके बहुतांश गाड्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्या असून त्यात अनेकजण अडकल्याची भीती आहे. याठिकाणी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातून सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे . जखमींना जवळच्या रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. ही पूल कोसळल्याची बातमी समजताच आसपासच्या लोकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच या पुलाच्या आसपास असलेल्या ऑफिसेस मधून कर्मचारी लगेचच बाहेर आले आणि त्यांनी देखील बचावकार्य करण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

दरम्यान, विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेच्या दोन वर्षांनी ही दुर्घटना झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकातामध्ये निर्माणधीन विवेकानंद फ्लायओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता.

दुर्घटनेची चौकशी करणार :ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलीस दुर्घटनेची चौकशी करतील, मात्र सध्या आमचं लक्ष फक्त बचावकार्यावर असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्ही चिंताग्रस्त आहोत. बचाव पथकाकडून आम्ही प्रत्येक अपडेट घेत आहोत’, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. सध्या ममता बॅनर्जी दार्जिलिंगमध्ये आहेत.

दरम्यान, राज्य सरकारचे मंत्री फिरहाद हकीम यांनी बचावकार्य संपलं असून कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच सर्च ऑपरेशन सुरु असल्याचंही ते बोलले आहेत.

[amazon_link asins=’B06XFLY878,B01ETSOX6U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea9b9745-b044-11e8-a21d-3f16abcfae51′]