मकर संक्राती बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिवस आणि रात्र म्हणजे आरंभ आणि अस्त. याच निसर्ग चक्रावर आधारित असलेला सण म्हणजे मकर संक्रात. आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते तसेच हवेतील थंडी कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरुवात होते. मकर संक्रात हा सुवासिनी स्त्रियांसाठी मोठा उत्सव मानला जातो. याच सणाबद्दल काही गोष्टी ज्या आपणास माहित नाहीत त्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे.

मकर संक्रांत हा सण भारतासहित या देशात केला जातो साजरा 
मकर संक्रांत हा सण फक्त भारतातच साजरा केला जाणारा सण नसून तो नेपाळ मध्येही साजरा केला जातो. नेपाळ मध्ये या सणाला ‘माघी संक्रांत’ म्हणले जाते. तर थायलँड मध्येही हा सण साजरा केला जातो तेथे त्याला ‘सोंक्रन’ या नावाने ओळखले जाते.

मकर संक्रांत हा १४ जानेवारीला येणारा सण 
मकर संक्रात एकमेव हिंदू सण हे जो इंग्रजी तिथीवर येतो. म्हणजे मकर संक्रांत सण १४ जानेवारीला येतो. मात्र २०१५ आणि २०१९ साली हा सण अपवादात्मक १५ जानेवारी रोजी आला आहे. कारण या दिवशी दिवस आणि रात्र समान असते.

आपला मकर संक्रात हा सण देशाच्या इतर भागात वेगळ्या नावाने ओळखला जातो
हिंदू सांस्कृतीचा आणि सूर्याचा घनिष्ठ संबंध असल्याने संपूर्ण भारतात हिंदू जण हा सण वेगवेगळ्या पध्द्तीने साजरा करतात. गुजरात मध्ये हा सण उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने ओळखला जातो. दक्षिणेकडे या सणाला पोंगल म्हणले जाते तर उत्तरेकडे या सणाला मकर संक्रांती म्हणले जाते. मात्र नावात साम्य असले तरी सण साजरा करण्याची पद्धती उत्तरेत महाराष्ट्रा प्रमाणे नाही.

पूर्वी ३१ डिसेंबर रोजी येत असे मकर संक्रांती 
हिंदू तिथी आणि इंग्रजी तिथी कधीही एकत्रित येऊ शकत नाही. काही शतके १४ जानेवारीला येणारा मकर संक्रांतीचा सण भविष्यात वेगळ्याच इंग्रजी तिथीला येईल. कारण इंग्रजी तारखेचा तंतोतंतपणा हिंदू तिथी एवढा अचूक नाही म्हणूनच १ हजार वर्षांपूर्वी मकर संक्रांत हा सण ३१ डिसेंबर रोजी येत असे.

आजच्या दिवशी येणारे मरण म्हणजे शांतीमोक्ष होय 
महाभारतातील एका कथेनुसार आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भीष्माचार्यांनी आपले इच्छा मरण घेतले होते. म्हणून आजच्या दिवशी मरण येणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी हिंदू मान्यता आहे.