म्हणून न्यायालयातून थेट व्हिडीओ कॉलकरून घटस्फोट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल वरून फोन करून, इमेल पाठवून, व्हाॅट्सअ‍ॅपवर मॅसेज पाठवून तिहेरी तलाक दिल्याचे प्रकार आपण पाहिजे अथवा ऐकले असतील मात्र न्यायालयीन कामकाजाच्या इतिहासात आज पहिल्यांदाच असे घडले आहे कि व्हाॅट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉलकरून घटस्फोट दिला गेला आहे. संबंधित खटल्याची पत्नी अमेरिकेत वास्तव्याला असल्याने तिचे मत आज न्यायालयाने व्हिडीओ कॉल व्दारे ऐकून घेतले आणि व्हिडीओ कॉल सुरु ठेवूनच न्यायालयाने घटस्फोट घडवू आणला आहे. हि घटना नागपूच्या कुटुंब न्यायालयात घडलीय आहे. या खटल्यातील पती नागपुरात वास्तव्यास असून त्याने आपल्या पत्नीच्या विरोधात न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

काय आहे नेमके प्रकरण 
नागपुरात राहणार तरुणाचे आंध्र प्रदेशातील तरुणीशी अरेंज मॅरेज झाले. लग्नानंतर दोघेही अमेरिकेत वास्तव्यास होते. छोट्या मोठ्या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली आणि दोघांची भांडणे घटस्फोटा पर्यत जाऊन पोहचली. दोघांमध्ये भांडणे झाल्याने दोघे वेगळे राहू लागले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या खटल्यातील पती असलेला तरुण आपल्या मूळ गावी म्हणजे नागपूरला वास्तव्यास आला. मात्र पत्नी अमेरिकेतच वास्तव्य करू लागली.

कारण ती स्टुडंट व्हिजा घेऊन अमेरिकेत गेली होती. ती माघारी आली असती तर तिचा स्टुडंट व्हिजा संपुष्ठात आला असता म्हणून तिने घटस्फोटासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तिने मशिनद्वारे पाठवून दिली. न्यायालयाने मशिनद्वारे आलेली कागदपत्रे आणि पत्नी घटस्फोटासाठी उपस्थित राहू शकणार नाही. हि बाब लक्षात घेऊन न्यायालयाने कागदपत्र ग्राह्य धरली मात्र न्यायाधीशांना या खटल्यातील पत्नीच्या तोंडून कागदपत्रात नमूद मजकूर ऐकायचा होता. म्हणून न्यायाधीशांनी त्या पत्नीला व्हाॅट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉलकरून संपर्क साधला आणि तिची बाजू तिच्या तोंडून ऐकून घेतली आणि त्या दोघांना लग्नाच्या बंधनातून कायदेशीर रित्या मुक्त करत असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आणि दोघांना घटस्फोट दिला.

न्यायालयीन इतिहासात हा खटला प्रथमच घडला असून त्या खटल्या बद्दल नागपूर मध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. पत्नीची दुविधा न्यायालयाने लक्षात घेऊन हा निर्णय दिला आहे असे न्यायालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी एका विद्यार्थ्यांचे नुकसान होता कमानये हि बाब लक्षात घेऊन न्यायालयाने आजचा निकाल  व्हाॅट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉलच्या आधारे दिला आहे.