मन हे वेडे….’ अल्बम रसिकांच्या भेटीला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मन हे वेडे या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून ’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…मानवी मनाच्या वैविध्यपूर्ण  भावना  स्वरात व्यक्त करणारा ‘हा अल्बम आहे . मन हे वेडे….’ या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वर दिला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजु अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे.
[amazon_link asins=’B07335K95J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c94cb1fd-a5cf-11e8-9076-bd03d123459b’]
छोटे उस्ताद’ या लोकप्रिय  कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा हिच्या आवाजात गाणी स्वरबध्द केली आहेत .  गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”बबन” चित्रपटातील मराठी गीतांना रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘मन हे वेडे….’ या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय सुंदर  आवाजात गायले असून हा अल्बम देखील रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी बोलून दाखविला.येत्या  २५ ऑगस्ट रोजी अल्बम प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली.