काँग्रेसतर्फे लातुरातून अनेकांचे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग

लातूर : पोलीसनामा आॅनलाइन – आगामी लातूर लोकसभा निवडणूक कॉँग्रेसतर्फे लढविण्यास इच्छुक असलेल्या व काही दिवसांपूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुंबईत प्रदेश कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. तब्बल ५२ इच्छुकांनी येथून खासदारकीची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रचंड उत्साहामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

मुंबई येथे पक्षाच्या नेत्यांसमोर मुलाखती दिलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसचे उपाध्यक्ष जयंत काथवटे, माजी आ. धर्मराज सोनकवडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, सेवानिवृत्त अधिकारी रामराव सोनकांबळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, ॲड. दिग्विजय काथवटे, प्रा. शिवाजी जवळगेकर, व्ही. एस. पॅँथरचे अध्यक्ष विनोद खटके, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. विजय अजनीकर, नेत्रतज्ज्ञ शिवाजी काळगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, निवृत्त कार्यकारी अभियंता किशन सूर्यवंशी, उद्योजक शिवाजी गायकवाड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार मधुकर कांबळे, महिला प्रदेश सचिव उषा कांबळे आदींचा समावेश आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेंचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना दणका 

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेवरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील टिळक भवन येथे जिल्हानिहाय आढावा बैठका होत आहेत. खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे सहप्रभारी आशिष दुवा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष शरद रणपिसे, आमदार विश्वजित कदम, आमदार बस्वराज पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, पक्ष प्रवक्ते राजू वाघमारे, सचिन सावंत व प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत लातूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.