सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शिरूर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन-सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने शेतात आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना शिरसगाव काटा ता. शिरुर  जि . पुणे या ठिकाणी घडली आहे. विवाहितेवर माहेरच्या माणसांकडून पैसे आणण्या साठी सतत त्रास दिला जात असल्याने तिने गळफास लावून जीवन संपवल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून समजते. बळी गेलेल्या महिलेच्या भावाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा  प्रकार उघड झाला आहे.

मंगल राजाराम शिंदे (वय ३१)असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या खुनाचा आरोप ठेवून पोलीसांकडून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजाराम तुळशीराम शिंदे(पती),मच्छिंद्र तुळशीराम शिंदे(दिर),सुमन तुळशीराम शिंदे (जाव),महेंद्र मच्छिंद्र शिंदे(पुतण्या) अशी आरोपींची नावे अाहेत. मच्छिन्द्र शिंदे याने सांगितल्या नुसार शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलो असता आपल्या भाऊजयीचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला अशी माहिती त्याने पोलीसांनी दिली.

मंगल शिंदे या मयत महिलेला सासरच्या माणसांकडून नेहमी पैशासाठी मारझोड केली जात असे मागच्या काही दिवसात माहेर कडून एक लाख रुपये घेऊन यायला सांगितले त्याबद्दल मंगल शिंदे या मयेत महिलेला मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्याबद्दल मयत मंगल शिंदे यांनी त्यांच्या भावाला कल्पना दिली होती सासरचा जाच असाह्य झाल्यामुळेच या महिलेने आत्महत्या केल्याचा दावा मयत महिलेचा भाऊ दिपक दत्ताञय साळूंके यांनी पोलिसांना सांगितले आहे.

आत्महत्येची घटना काल उघडकीला आली असून परवा रात्री मयत महिलेने फाशी घेतली आहे. खूनी गुन्हेगारांना अटक झाल्या शिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा परिवारातील व्यक्तींनी पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनी मद्यस्ती करून शनिवारी (आज) दुपारी बारा वाजता मृतदेह ताब्यात घेतला आहे. पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मंगल शिंदेंच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.