सुपर मॉम मेरी कॉमची सुवर्ण कामगिरी 

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारताची अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोमने गत वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दिल्‍ली येथे झालेल्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. या विजयासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला होता. मेरी कोमने अशीच आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जागितक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) मेरी कोमने अव्वल स्थान पटकावले आहे.
तिच्या या कामगिरीमुळे ती या स्‍पर्धेतील सर्वात यशस्‍वी बॉक्सिंगपटू ठरली आहे. एआयबीएने जाहीर केलेल्‍या क्रमवारीत १७०० गुणांसह मेरी कोम पहिल्‍या स्‍थानावर पोहचली आहे.
मेरी कोमसह भारताच्या पिंकी जांगरा हिने ५१ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या मनीषा मौन हिने ५४ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर, सोनिया लाथर हिने ५७ किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावले आहे.
‘तो’ काळ मेरी कॉम साठी खडतर 
मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचॆ बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे वीजेतेपद मिळवले. वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला.