‘ऑस्ट्रेलिया को बच्चा मत समजना!’; मॅथ्यूचे सेहवागला उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट सामने त्यांच्या स्लेजिंगवरून नेहमी चर्चेत असतात. भारतीय संघ लवकरच २४ तारखेपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २ टी-२० आणि ५ वनडे सामने होणार आहेत.

दौऱ्याआधी Star sports वाहीनीने एक जाहीरात केली आहे. या जाहीरातीत माजी क्रिकेट खेळाडू विरेंद्र सेहवाग आहे. त्यात सेहवागने ऑस्ट्रेलीयाच्या संघाची ’बेबीसिटींग’ प्रकरणावरुन खिल्ली उडवली आहे.

सेहवागने केलेल्या जाहीरातीवर सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. इतकच काय तर ज्या टीम पेन आणि ऋषभ पंतमध्ये बेबीसिटींग प्रकरणावरुन द्वंद्व रंगलं होतं, त्यावरून पंतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सेहवागने केलेल्या या जाहिरातीवर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने उत्तर दिलं आहे. एका नवीन अँड कँपेनमधून हेडनने सेहवागला उत्तर दिलं आहे. यात हेडनने ऑस्ट्रेलियाको बच्चा मत समजना, असा सल्ला दिला आहे.