#MeToo माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न – राजकुमार हिरानी

मुंबई : वृत्तसंस्था – #MeToo चे वादळ शांत असताना अचानक या वादळात राजकुमार हिरानी यांचे नाव समोर आले. त्यांच्या अनेक चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. ‘संजू’ चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या महिलेने  मार्च ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत हिरानी यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप या महिलेने केला होता. हे आरोप महिलेने मेलद्वारे हिरानी यांच्याबरोबरच दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्यावर केले होते. हा सर्व प्रकार ‘संजू’च्या निर्मितीनंतर घडल्याचे तिने सांगितले होते. या आरोप नाकारत हिरानी यांनी एक स्टेटमेंट दिली आहे.
या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट दिले असून, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी माझ्यावर असे आरोप झाल्याचे मला कळले आणि मला धक्का बसला. हे सगळे प्रकरण कुठल्या लीगल बॉडीकडे वा कमेटीकडे नेण्याचा विचार मी केला असतानाच याप्रकरणात मीडियाची मदत घेतली गेली. पण हे आरोप मला मान्य नाहीत. या आरोपांचे मी खंडन करतो. हे सगळे आरोप एका कटाचा भाग आहेत आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत,असे हिरानींनी म्हटले आहे.
महिलेने राजकुमार हिरानी आणि विधू विनोद यांच्याशिवाय विधू यांची पत्नी अनुपमा चोप्रा, कथा लेखक अभिजात जोशी, विधू यांची बहीण आणि संचालिका शेली चोप्रा यांनादेखील तिने मेल केला होता. काल याप्रकरणी राजकुमार हिरानींच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली होती. हिरानी यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे वकील आनंद देसाई यांनी म्हटले होते.
महिलेने केलेल्या आरोपांनुसार, हिरानी यांनी आपल्यावर अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी माझे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. आपण या शोषणाला विरोध केल्यानंतर आपल्याकडून चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकीही हिरानी यांनी दिल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. आपल्याकडे असणारे काम आपल्याला घालवायचे नसल्याने आपण त्यावेळी आवाज उठवला नाही असेही या महिलेने म्हटले आहे. एका रात्री माझ्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीमुळे मी पूर्णपणे खचून गेले.