मेट्रोचे कामकाज म्हणजे पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार : साने

पोलीसनामा ऑनलाईन इम्पॅक्ट

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर काम करु नये असे आदेश दिले असताना महामेट्रोकडून बॅरीकेटस् लावून बीआरटीच्या मार्गात खोदाई सुरु आहे. यावरुन पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार असल्याची, टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. तसेच मेट्रोचे काम थांबविण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc74f0d1-a61b-11e8-8872-eb293e21a585′]

महापालिकेच्या नोटीसीला महामेट्रोकडून केराची टोपली ही सविस्तर बातमी सर्वप्रथम पोलिसनामा ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर यावर टिका होऊ लागली आहे. साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावरील त्रुटी दूर करुन तो लवकरात लवकर कार्यान्वयीत करावा, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने बीआरटी विभागाने या मार्गावरील त्रुटी दूर करुन बसची चाचणी घेतली आहे.

एकीकडे बीआरटी मार्गातील त्रुटी दूर करुन बीआरटी सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असताना मागील काही दिवसांपासून डॉ.आंबेडकर पुतळा ते मोरवाडी चौक येथे अचानक बॅरीकेटस् लावून बीआरटीच्या मार्गात मेट्रोचे काम सुरु करण्यात आले आहे. याआधी पालिकेने बीआरटी मार्गावर मेट्रोचे काम करु नये असे स्पष्ट आदेश मेट्रोला दिले होते. असे असतानाही मेट्रोने बिनदास्तपणे बीआरटी मार्गामध्ये काम चालू केले आहे. हा प्रकार म्हणजे पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01b3419f-a61c-11e8-97e4-891e5489c1de’]

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘मेट्रोच्या कामाला दोन महिने विलंब झाला आहे. त्यामुळे खोदाई करावी लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात महा मेट्रोला खोदाईस परवानगी देण्यात आली आहे’.