राजकीय

‘या’ निर्णयामुळे महाराष्ट्राचे नाक कापल्या गेले : भाजप मंत्री

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – साहित्य संमेलनात जो वाद सुरू आहे त्या वादाशी सरकारचं काहीही देणं घेणं नाही. आम्हीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत अशी स्पष्ट भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडली. संमेलनाला कुणाला बोलवावं आणि कुणाला बोलावू नये हे सांगण्याचं काम सरकार कधीच करत नाही.

मात्र तरीही या वादात मुख्यमंत्र्यांचं नाव गोवणं चुकीचं आहे असंही ते म्हणाले. गेली काही दिवस वादात अडकलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनां शुक्रवारी उद्घाटन झालं. यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तावडे काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं.

तावडे म्हणाले, “सहगल यांना दिलेलं निमंत्रण परत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारलाही आवडला नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं आहे.” ते पुढं म्हणाले, “काही वर्षांपूर्वी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका विदेशी विद्यापीठात भाषण द्यायला बोलावलं होतं. त्यावेळी आपल्याच काही लोकांनी त्या विद्यापीठाला पत्र लिहून त्यांना न बोलावण्याची मागणी केली होती. आज बोलणाऱ्या लोकांनी त्यावेळी निषेध व्यक्त केला असता तर ती त्यांची भूमिका प्रमाणिक समजली असती. मात्र आज लोकांना खरं काय आहे ते कळतं.”

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र त्याला भारतातून विरोध झाला होता. मोदींच नाव न घेता तावडेंनी ती घटना सांगितली.

मराठीची सक्ती

सगळ्या शाळांना चौथ्या वर्गापर्यंत मराठी सक्तीची करण्यात आली आहे असं न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचं मराठी वांड्मयमंडळ सक्तीचं करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या