खोटं बोलण्याच्या सर्व मर्यादा मोदींनी ओलांडल्या : मनसे नेते

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – गुढीपाडव्यापासुन राज ठाकरे यांनी मोदीमुक्त भारतची हाक दिली आणि त्यानंतरच देशातील सर्व पोट निवडणुकातील चित्र बदलण्यास सुरूवात झाली. पंतप्रधानपदाच्या उमेदवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन देशातील जनतेने देश मोदींच्या हाती सोपविला. परंतु, एवढा खोटारडा पंतप्रधान असेल असे कोणालाही वाटले नाही. खोटे बोलण्यालाही काही मर्यादा असतात मोदींनी खोटं बोलण्याच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे, हे देशाने पाहीले आहे, याची किंमत भाजपाला मोजावी लागेल, असा अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महाबळेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केली.

मनसेला काँग्रेस आघाडीत घेण्यात राष्ट्रवादीला जेवढा रस आहे. तेवढाच विरोध काँग्रेसमधुन होत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना नांदगावकर म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रु नसतो. कोणत्या पक्षाला काय वाटते. यापेक्षा आम्हाला काय वाटते हे महत्वाचे आहे. आम्ही कोणाबरोबर गेल्यावर राज्यातील जनतेला काय वाटेल याचा पक्षाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. कसेही करून आम्हाला आघाडीत घ्या, म्हणत आम्ही कोणाच्या मागे लागलो नाही. आम्ही कोणाबरोबर जावे आणि कोणाबरोबर जावु नये याचा सर्वस्वी निर्णय आमचे नेते राज ठाकरे घेणार आहेत. आम्ही गेली बारा वर्षे एकला चलो याच भुमिकेत होतो. आजही आमच्या या भुमिकेत फरक पडलेला नाही, असे नांदगावकर म्हणाले.

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मराठा उपोषण सुरूच राहणार

प्रादेशिक पक्षाच्या मदतीने सत्ता हस्तगत करायची आणि नंतर त्यांना सोडुन द्यायचे, अशी रणनिती भाजपाची आहे. परंतु आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यानंतर भाजप याच प्रादेशिक पक्षांना जवळ करत आहे. वेगवेगळे पॅकेजची लालुच दाखवुन त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाने करत आहे. परंतु, आता प्रादेशिक पक्ष या थापांना बळी पडणार नाहीत. अटल बिहारी वाजपेयी यांनादेखील ममता, माया आणि जयललिता यांना बरोबर घ्यावे लागले होते. तेव्हा केंद्रात त्यांना सत्ता मिळाली होती, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले. नाशिकचा विकास पाहुन राज्यातील जनतेला आता राज्याची सत्ता राज साहेबांकडे सोपविली पाहीजे, असेही ते म्हणाले.