शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा निघाला मोबाईल चोर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला मोबाईल चोरी प्रकरणी स्थानिकांनी चोप देत अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा तो मुलगा असून त्याच्यावर ५० हून अधिक मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेनेच्या शाखाप्रमुख कविता पांचाळ यांच्या मुलाला अंधेरी पूर्व परिसरात मोबाईल चोरताना स्थानिकांनी पाहिले. दरम्यान स्थानिकांनी त्याला पकडून चोप देत, पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान शिवसेनेच्या शाखाप्रमुख कविता पांचाळ यांच्या मुलाला अमली पदार्थाचे व्यसन होते. तेच व्यसन करण्यासाठी विनायक चोरी करत असे. अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर विनायकवर ५० हून अधिक मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. असेही ते म्हंटले.

विशेष म्हणजे, ५० हून अधिक मोबाईल आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे असल्याचे कबुल केले आहेत. दरम्यान विनायकला अटक केली असून पोलीस कोठडीत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.