मोदींनी व्यक्त केला २०१९ च्या लोकसभेचा विजयाचा विश्वास ; काय म्हणाले मोदी ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते आज  अनेक विकास कामाचे उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात आले आहे. आज नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचा कोनशिला समारंभ केला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला डोळ्यासमोर ठेवून मोदींनी  २०१९ च्या लोकसभेचा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ज्या कामाचे भूमिपूजन आम्ही करतो त्या कामाचे उद्घाटन आम्हीच करतो आणि मी दावा करतो कि या गृह प्रकल्पातील घराच्या चाव्या प्रधान करण्यासाठी हि मीच येणार आहे असे म्हणत मोदींनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा दावा केला आहे.

देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प लोकांना बनवून देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला असून हा प्रकल्प केंद्र सरकार कडून हा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी विशेष प्रयत्न केला आहे. कष्टकरी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. याच अंदाजाला लक्षात घेऊन मोदींनी चाव्या द्यायला मीच येईल असे म्हणले आहे. अर्थात याचा अर्थ हा होती कि, २०२३ मध्ये हि मीच पंतप्रधान असेल असे नरेंद्र मोदी यांना म्हणायचे होते.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे ठळक मुद्दे 

– भाषणाची मराठीतून सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणास नमन करून सिद्धेश्वर ,स्वामी समर्थ आणि संत दामाजी पंथ यांचा मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला केला उल्लेख

-१० टक्के आरक्षणाच्या मुद्द्याचा मोदींनी केला उल्लेख

– अनुसूचित जाती ,जमाती आणि इतर मागासांच्या आरक्षणाला कसला ही धक्का नलावता १०टक्के आरक्षण सवर्ण गरिबांना दिले जाणार आहे.

– काल लोकसभेने स्वीकारलेले विधेयक आज राज्यसभा स्वीकारेल हि माझी अशा आहे.

–   १० टक्के आरक्षणाचा उल्लेख करताच समोरच्या उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या नंतर मोदींनी लोकांना म्हणले कि , १० टक्के आरक्षणाला तुमचा पाठींबा आहे हे तुमच्या टाळ्यावरून समजते आ हे.

– २००४ते २०१४ अशी १० वर्षे देशात रिमोट वर चालणारे सरकार होते.