रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांची ओव्हर टाईम कामासाठीची रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात हजार रुपयांची वाढ होईल. रेल्वेमधील गार्डस्, लोको पायलट्स, आणि साहयक लोको पायलट यांच्या ओव्हर टाईम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ७ व्या वेतर आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे.

सध्या गार्डस्, लोको पायलट्स आणि सहायक लोको पायलट यांचा ओव्हर टाईम २५५ रु प्रति १०० किमी ला करण्यात आले आहे. जे वाढून आता ५२० रुपये होईल. रेल्वेमधील वेगळ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २०१७ मध्ये भत्ता वाढवण्यात आला होता. मात्र रनिंग स्टाफ आणि रेल्वे बोर्ड यांच्यात वाद सुरु होते. २०१६ मध्ये रनिंग अलाउंस वाढवण्याबाबत मागणी केली होती. त्यावर २०१८ मध्ये रेल्वे बोर्डाने रनिंग अलाउंस दुप्पट करण्याचे आदेश दिले. आता रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयावर अर्थ मंत्रलाय या महिन्यात शिक्का मोर्तब करण्याची शक्यता आहे, असं म्हटलं जात आहे.

अर्थ मंत्रालयाने रेल्वे बोर्डाच्या निर्णयावर शिक्का मोर्तब केला तर  मेल- एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, सुपर फास्ट रेल्वे आणि मालगाडी यांचे लोको पायलट आणि गार्ड यांना प्रति १०० किमी वर ५२० रुपये मिळतील. असं लोको पायलट आणि गार्ड यांच्या पगारात प्रति महिना १२ हजार ते २५ हजार रुपयांनी वाढ होऊ शकते.

दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनुसार लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाडी यांच्या लोको पायलट आणि गार्ड यांच्या वेतनात दोन रुपयांचा फरक असतो. मात्र रेल्वे विभागाच्या या निर्णयावर अर्थ मंत्रालय काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.