‘या’ आजारी नेत्यांमुळे मोदी सरकार चिंतेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकी आधीचा मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 15 दिवसांवर येऊन ठेपला असतांनाच. मंत्रि मंडळातील अनेक महत्त्वाचे नेते आजारी पडल्याने मोदी सरकारची चिंता वाढली आहे.
भाजपचे ‘हे’ नेते आहेत आजारी… 
* अमित शाह
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर एम्समध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वत:अमित शहांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. असून छातीत कळ व ताप आल्यामुळे त्यांना एम्समध्ये आणले हाेते. एम्सचे संचालक त्यांच्यावर उपचार करत आहेत. अमित शाह पुढील दोन-तीन दिवस हॉस्पिटलमध्येच राहण्याची शक्यता आहे.
* अरुण जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मांडीतील पेशींचा कर्कराेग असल्याचे निदान झाले आहे. ते उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले. असून त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये २ आठवडे उपचार केले जाणार आहेत. यामुळे ते केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या वर्षीही मूत्रपिंड प्रत्याराेपण शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या गैरहजेरीत अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
* रवीशंकर प्रसाद
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना श्वसननलिकेत त्रास होत असल्याने त्यांना देखील सोमवारी (14 जानेवारी)ला एम्समध्ये दाखल केले होते. त्यांना आयसीयूमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात आले असून. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
* सुषमा स्वराज
परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज या २०१९मधील लोकसभा निवडणूक लढणार नाहीत.अशी घोषणा त्यांनी इंदूरमध्ये केली होती 2016 मध्ये प्रकृती बिघडल्याने सुषमा स्वराज यांना देखील एम्समध्ये रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. माझी किडनी निकामी झाली असून डायलिसिसवर असल्याचं ट्वीट त्यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून पक्षाच्या कार्यक्रमात त्या फारच कमी दिसतात.
* मनोहर पर्रिकर
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना कॅन्सरने ग्रासले असून. मुंबईत काही दिवस उपचार घेतल्यानंतर पर्रीकर गोव्यात परतले होते. मात्र, स्वादुपिंडावर भारतापेक्षा अमेरिकेत आधुनिक उपचार होत असल्याने त्यांना तेथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती बिघडल्यास खबरदारी घेण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक देखील त्यांच्यासमवेत आहे.