मोदींनी सांगितलं उत्तर बंगालशी असलेलं ‘अनोखं नातं’

कोलकाता : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वाद सर्वश्रुत आहेतच. मात्र नरेंद्र मोदींनी आपलं आणि उत्तर बंगालमध्ये असलेल्या एका वेगळ्या नात्याचा खुलासा केला आहे. जलपाइगुडी येथील जाहिर सभेत ते बोलत होते.

उत्तर बंगालसोबत माझे एक वेगळं नात आहे. जे तुम्हालाही माहित आहे. हे नात म्हणजे चहाचे आहे. तुम्ही चहा उगवणारे आणि मी चहा बनवणारा आहे, असं हे खास नात त्यांनी यावेळी सांगितलं. खरचं हे नात खास असतेच म्हणा उगवणाऱ्यालाही माहित नसते, की हा चहा कोण बनवणार आहे. त्यानंतर बनवणाऱ्यांनी तो उत्तम बनवला तर तो चहा जास्त चवदार आणि कडक लागतो.

उत्तर बंगालसोबत असलेले नात सांगितल्यानंतर त्यांनी मात्र पश्चिम बंगालच्या सरकारवर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या सरकारने देशाच्या मातीला बदनाम केले आहे तर लोकांना मजबुर केले आहे, अशी खोचक टीका मोदींनी यावेळी केली. पश्चिम बंगाल हा कला आणि संस्कृतीसाठी ओळखला जायचा मात्र आता हिंसा आणि अनैतिक गोष्टींसाठी ओळखला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आज पश्चिम बंगालची स्थिती अशी आहे की मुख्यमंत्री दिदी (ममता बॅनर्जी) आहेत, परंतु दादागिरी कोणा दुसऱ्यांचीच चालते. येथे शासन तृणमुल काँग्रेसचे जगाई आणि मदाई करत आहेत. तृणमुल सरकार हे योजनांच्या नावांवर दादालांचा अधिकार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दीदी म्हणजे ममता या दिल्लीला जाण्यासाठी आतुर आहेत. तर गठबंधण करून बंगालमधील गरिब आणि मध्याम वर्गाला लुबाडण्यासाठी सोडले आहे, असा आऱोपही त्यांनी यावेळी केला.