मोहन भागवत करणार युतीसाठी मध्यस्थी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना युतीवर शिक्का मोर्तब कधी होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने भाजप सोबत जाण्यासंदर्भात अद्याप तरी इन्कार केला आहे तर भाजपने युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचा दावा नेहमी केला आहे. अशातच मोहन भागवत हिंदू मतांचे विभाजन टाळता यावे म्हणून युतीचा पेच सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार आहेत असे वृत्त समोर आले आहे.

भाजप आणि शिवसेनेची युती झाली असल्याच्या बातम्याही माध्यमातून झळकू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ जागी लढणार आहे अशी राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. तर निवडणुकीच्या संदर्भात माध्यमांच बातम्या पेरल्या आहेत. युतीच्या चर्चेबाबत माध्यमांनी थोडे सबुरीने घ्यावे असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हणले आहे.

आगामी काळात शिवसेना भाजप युतीसाठी भाजपचे तीन बडे नेते मातोश्रीवर जाणार आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी हे तीन नेते मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्याच प्रमाणे युती संदर्भात बोलणी करताना विधानसभा निवडणुकीची बोलणी हि करून घ्यावी असे शिवसेनेने म्हणले आहे. युतीचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.