क्राईम स्टोरी

त्रासाला कंटाळून घटस्फोटीत पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संसारात होणाऱ्या वादामुळे दोघांनी घटस्फोट घेतला. पण त्यानंतर पतीला उपरती होऊ लागली व तो पुन्हा आपल्या पत्नीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला. पण, एकदा मन तुटल्यावर पत्नीने त्याला अव्हेरले. तरीही त्याची मजल अश्लिल मेसेज पाठविण्यावर गेल्यावर पत्नीने आपल्याच घटस्फोटीत पतीविरोधात विनयभंगाची तक्रार दिली असून वाकड पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी काळेवाडी येथे राहणाऱ्या २१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर २०१८ पासून सुरु होता. त्यांचे यापूर्वी लग्न झाले होते. पण दोघांचे पटत नसल्याने त्यांनी काही काळात घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर या महिलेने पुन्हा आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले. पिंपरीत राहणारा पती घटस्फोटानंतर वारंवार तिला भेटायला कॉलेजला व काळेवाडी येथील घरी येऊ लागला. कॉलेजवरुन पायी घरी जात असताना तिला रस्त्यात आडवून दमदाटी करत असे. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास ती पायी जात असताना त्याने तिला रस्त्यात अडविले. तिचा हात पकडून दमदाटी करुन जवळीक साधू लागला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करु लागला. त्यातून सुटका करुन ती घरी गेली.

पती तिला मोबाईलवरुन अश्लिल मेसेज पाठवून दमदाटी करु लागला. तिच्यानंतर तो आता आईच्या मोबाईलवरही तो मेसेज पाठवू लागला. हा त्रास असह्य झाल्याने शेवटी तिने आपल्या घटस्फोटीत पतीविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली असून वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button