राजकीय

मुख्यमंत्र्यांना ‘डाकू‘ म्हणणे भोवले ; मुख्याध्यापक निलंबीत 

जबलपूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करणे एका मुख्याध्यापकाच्या नोकरीवर बेतले आहे. मुख्यमंत्र्यांवर केलेल्‍या टीकेमुळे या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. मुकेश तिवारी असे निलंबीत करण्यात आलेल्‍या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्‍यानंतर काँग्रेस समर्थकांनी जबलपूर जिल्ह्याचे जिल्‍हाधिकारी छावी भारद्वाज यांची भेट घेउन मुकेश तिवारी यांना निलंबीत करण्याची मागणी केली. व्हिडिओची चौकशी केल्‍यानंतर तिवारी यांना निलंबीत करण्याचे जिल्‍हाधीकाऱ्यांनी आदेश दिले.
जबलपूर येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत मुकेश तिवारी हे मुख्याध्यापक म्‍हणून काम करत आहेत. त्‍यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. ‘‘१४ वर्षे भाजपचे सरकार होते त्‍यावेळी आम्‍हाला त्रास सहन करावा लागत होता. परंतु, आता तर काँग्रेसचे सरकार आले आहे. आता काय होतंय ते पहावे लागणर आहे. आमच्या समाजात अनेक अडचणी आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कसेही असले तरी ते आमचेच होते. परंतु, कमलनाथ यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या ते तर डाकू आहेत.’’ असे वक्‍तव्य मुख्याध्यापक तिवारी यांनी केले आहे.मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला शह देत काँग्रेस सत्तेत आले आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या