ट्रिपल तलाक वरून समाजात दुफळी केली जात आहे – सुप्रिया सुळे

कोंढवा : पोलीसनामा ऑनलाईन – ट्रिपल तलाकवरून भाजपा सरकार समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम केले जात आहे. सरकारने बेरोजगारी, प्रदूषण, महागाई, रस्ते बनविणे अशी कार्य करणे गरजेचे आहे. सरकारने अश्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करून समाजात दुफळी निर्माण करू नये, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ट्रिपल तलाक, शबरीमाला अश्या बाबतीत हस्तक्षेप करून हे सरकार लोकाच्या, समाजात गट निर्माण करित आहे. कोंढवा येथे ताकव ज्वेलर्स दुकानच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

सरकारने रोटी, कपडा, मकान व इतर प्रश्नावर काम करणे अपेक्षित असताना हे सरकार लोकांच्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ करित असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा सरकारने ट्रिपल तलाक बाबत लोकसभेत विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर केले असले तरी हे विधेयक राज्यसभेने अजून मंजूर केले नाही. ट्रिपल तलाक बाबत पहिल्यांदा सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा अशी तरतूद केली होती ती आता तीन वर्षाची केली आहे. ट्रिपल तलाकबाबत एक विधेयक राज्यसभेत मंजुरी असताना ह्या सरकारने नवीन तरतूद का मजूर केली आहे हा प्रश्न निर्माण होत आहे.

यावेळी आपण याला भविष्यात हि विरोध करणार असून याबाबत लोकांची भूमिका लोकसभेत प्रखरतेने मांडणार आहे, असेही यावेळी सुळे म्हणाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, नगरसेवक हाजी अब्दुल गफूर पठाण, नगरसेविका परवीन फिरोज शेख, हमीदा सुंडके, माजी नगरसेवक फारुख इनामदार, रईस सुंडके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके, हाजी फिरोज शेख, हसीना इनामदार, नंदा लोणकर, नारायण लोणकर, हाजी इस्माईल इनामदार, शफी भाई इनामदार, ताकव ज्वेलर्स चे संचालक असरार इनामदार, सहसंचालक मुझफ्फर पटेल, बसित शेख उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन इस्माईल आगवान व आभार प्रदर्शन बसित शेख यांनी केले.