पोलीस घडामोडी

मुंबई पोलिस घेणार सायकलीवरून गुन्हेगारांचा शोध 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस म्हटलं की, त्यांना वेगवेगळ्या अहवाहनाला सामोरे जावे लागते. मग चोरी, दरोडे,  पाकिटमार, मारामारी अशा अनेक गोष्टीचा सामना मुंबई पोलीसाना करावा लागतो. त्यावेळी सायकलवरुन गुन्हेगारांचा पाठलाग करणे  सोपे व्हावे म्हणून मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच ई-सायकल दाखल होणार आहे. ही ई-सायकल दिसायला सर्वसामान्य सायकलसारखी आहे. या ई-सायकलची चाचणी झाली असून पेडल न मारता ही सायकल २५ ते ३० किलोमीटरचे अंतर कापू शकते तसेच या सायकलचा ताशी वेग २५ किलोमीटर आहे.

या सायकलचा कसा वापर करता येईल त्यासंदर्भात लवकरच पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बॅटरीवर ही सायकल तीन तास चालेल. त्यानंतर तासभराचे चार्जिंग लागेल. मुंबई पोलीस गस्तीसाठी सुद्धा ही सायकल वापरणार आहेत. मुंबईतल्या अरुंद गल्ल्यांमध्ये वाहनांना सहजासहजी प्रवेश करता येत नाही. या सायकलमुळे पोलिसांचे गस्तीचे काम अधिक सोपे होईल.

गस्त घालताना पोलीस सामान्य सायकलसारखा याचा वापर करु शकतात. आणीबाणीच्या प्रसंगात चपळतेने कारवाई करण्यासाठी बॅटरी ऑन करुन वेग वाढवता येईल. अरुंद गल्ल्यांमध्ये चोरांचा पाठलाग करताना ही सायकल खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी बाईकऐवजी ही सायकल देण्यात येईल. बॅटरीवर असताना पेडल मारले तर सायकलचा वेग आणखी वाढेल.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या