अप्पर पाेलिस महासंचालकांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी मंदिर आणि मशिदींमध्ये लावल्या जाणाऱ्या ध्वनीक्षेपकांवर  कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. आता न्यायालयाचा आदेश न पाळल्यामुळे नवी मुंबई चे अप्पर पाेलिस महासंचालक संजय कुमार अडचणीत आले आहेत. याबाबत न्यायालयाने महासंचालक यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढत त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे नवी मुंबई अप्पर पाेलिस महासंचालक यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
[amazon_link asins=’B07BMT1VSS,B01GRI6Q3I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a318f218-b822-11e8-a529-b3458e05b502′]

नवी मुंबईतील मशीदींवर विनापरवानगी भोंगे लावण्यात आले होते. त्याशिवाय मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळांवरही विनापरवानगी लाऊडस्पीकर लावण्यात आले होते. त्यावर का कारवाई करण्यात आली नाही? असा सवाल न्यायालयाने संजय कुमार यांना आज केला. कोर्टाने याप्रकरणी संजय कुमार यांना नोटीस बजावली असून २३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत.
[amazon_link asins=’B00D75AB6I,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aecae9f6-b823-11e8-a476-8163611deecf’]

दरम्यान प्रसिद्ध गायक सोनू निगम याने एप्रिल महिन्यात मशिदींवरून दिल्या जाणाऱ्या अजानच्या विरोधात ट्वीट केले होते. त्याची दखल घेत पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते, की अजान हा इस्लामचा अविभाज्य भाग असला तरी तो ध्वनिवर्धकावरून प्रसारित करू नये.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.