ताज्या बातम्या

सभेला मनपा अधिकारी उपस्थित राहणार नाहीत : उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर यापुढे कोणत्याही सभेला महापालिका अधिकारी उपस्थित राहणार नाहीत.

अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आचारसंहिता निर्माण करावी अशी मागणी पुणे कामगार युनियन, पी.एम.सी. एम्प्लाईज युनियन, पुणे मनपा अभियंता संघ या संघटनांनी केली आहे. हा त्रास कनिष्ठ अधिकार्यांना होत असतो.

कालच्या घटना ही वरीष्ठ अधिकार्याबाबत घडली आहे. यापुढे असा प्रकार होऊ नये यासाठी आचारसंहिता आवश्यक असून ती करेपर्यंत अधिकारी कोणत्याही समितीच्या सभा आणि मुख्य सभेला उपस्थित राहणार नाही असे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उदयनराजे जनतेला म्हणतात, हमे तुमसे प्यार कितना….

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या