क्राईम स्टोरी

दलित पँथर कार्यकर्त्याचा गळा दाबून खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहरातील शेंद्रा एमआयडीसीत मुख्य रस्त्यावरील एका कंपनी समोर उभ्या असलेल्या बेवारस कारमध्ये आज सकाळी साडे अकराच्या सुमरास मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून हा मृतदेह दलित पँथरच्या एका कार्य़कर्त्याचा असून त्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच दलित पँथरच्या कार्य़कर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली.

प्रकाश कडुबा कासारे (वय-४८ रा. मुकुंदवाडी) असे खून करण्यात आलेल्या दलित पँथरच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कासारे यांचा मृतदेह शेंद्रा एमआयडीसी मधील हरमन कंपनीसमोर एका कारमध्ये आढळून आला. कारमध्ये मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना नागरिकांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची पहाणी केली. त्यावेळी हा मृतदेह कासारे यांचा असून ते दलित पँथरचे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. कसारे यांचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या