दगडाने ठेचुन एकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे सर्व्हिस रस्त्यावर एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघड आला.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बावधन येथील तलाठी कार्यालयाजवळ सर्व्हिस रस्त्यावर एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दगडाने ठेचुन खून केल्याचे निदर्शनास आले. ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाच्या डोक्यात दगड घालण्यात आला आहे. हा कामगार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस ससून रुग्णालयात पोहचले असून तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.