कुडनूर येथे धारधार शस्त्राने वार करून तरूणाचा खून

जत / येळवी : पोलीसनामा आॅनलाइन – कुडनूर (ता. जत) येथील सिध्दनाथ बाबासाहेब सरगर (वय 25) या तरूणाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. एेन दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत माहिती अशी, सिध्दनाथ हा तरूण ट्रॅक्टर चालक आहे. तो कुडनूर हद्दीतील सरगर वस्तीवर राहतो. बुधवारी लक्ष्मीपूजनाचे साहित्य आणण्यासाठी मोटारसायकल वरून कुडनूरला गेला होता. रात्री परत घरी येताना खांडेकरवस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ अज्ञाच व्यक्तीने मोटारसायकल थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वार डोक्यात लागल्याने तो जागीच ठार झाला. हल्ल्यानंतर मारेकरी पसार झाले.

भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार 

सिध्दनाथ याचा मृतदेह व मोटारसायकल खांडेकरवस्तीजवळ आढळून आला. गावकर्‍यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,  पोलिसांनी खुनाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान ऐन दिवाळी सणात खुनाची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.