…म्हणून माथेफिरु जावयानं सासरवाडीत जाऊन केला मेव्हण्याचा खुन

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – माहेरी गेलेल्या पत्नीस आणण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने कौटुंबिक वादातून मेहुण्याच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केल्याची घटना सेनगाव शहरातील मारुती मंदिराजवळ मध्यरात्री घडली. या घटनेने सेनगाव शहरात खळबळ उडाली असून आरोपी राजाराम ऊर्फ राजू लक्ष्मण आउटे (रा. हयातनगर, ता. वसमत) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सेनगाव शहरातील रमाबाई भारतअप्पा महाजन यांची मुलगी सारिकाचा विवाह दहा वर्षांपूर्वी वसमत तालुक्यातील हयातनगर येथील राजाराम ऊर्फ राजू लक्ष्मण आउटे याच्याशी झाला. त्यांना दोन मुलेही झाली. मागील काही दिवसांपासून मात्र सारिकाला सासरच्या मंडळींकडून या-ना त्या करणांतून शारीरिक व मानसिक त्रास दिल्या जात होता. या त्रासाला कंटाळून सारिका दहा दिवसांपूर्वी सेनगाव येथे माहेरी आली होती. त्यानंतर सारिकाचा पती राजाराम आउटे हा सेनगाव येथे पत्नीला घेण्यासाठी आला होता. रात्री जेवण आटोपल्यानंतर सारिकाचे आई-वडील व भाऊ मन्मथ महाजन हे राजाराम ऊर्फ राजू आउटे याच्याकडून सारिकाला होत असलेल्या त्रासाबद्दल विचारणा करीत होते.

यावेळी सारिकाचा भाऊ मन्मथ भारतअप्पा महाजन (२३) याने बहिणीस त्रास देऊ नका, चांगले नांदवत असाल तरच तुमच्याकडे पाठवितो, असे म्हणाला. पत्नीचा भाऊ बोलल्याचा राग राजारामला आला आणि त्याने जवळच पडलेला खलबत्ता उचलून मन्मथच्या डोक्यात जोराने हाणला. यामध्ये आरोपी राजाराम आउटे हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सासू रमाबाई यांनाही लाकडाने बेदम मारहाण केली. त्यानंतर राजाराम घटनास्थळावरून फरार झाला.

‘त्या’ व्यापाऱ्याच्या हत्येनंतर नाशिककर दहशतीखाली