कर्जत बंद ; आंदोलनात पेटवून घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू 

कर्जत (अहमदनगर ) : पोलीसनामा ऑनलाईन – देवस्थानच्या जमीनी बळकावण्याचे प्रकार या  महाराष्ट्राला नवीन नाहीत. परंतु आंदोलन करत असताना एकाद्या व्यक्तीचा जीव  जाणे हि बाब खूपच गंबीर आहे. दावल मालिक देवस्थान  हि अहमदनगर जिल्ह्यातील कर्ज येथील प्रसिध्द् देवस्थान. या मुस्लिम देवस्थानावर मुस्लीमा सहित हिंदू हि माथा टेकवतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे एक उत्तरं उदाहरण आहे.  तर या देस्थानाच्या मालकीची असणारी जमीन अनेक लोकांनी बळकवून त्या ठिकाणी आपले व्यवसाय थाटले आहेत याच विरोधात काल  (गुरुवारी )जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनात  स्वत:ला पेटवून घेणाऱ्या  तौसिफ हमीम शेख यांचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आज कर्जतमध्ये तणाव पूर्ण शांतता आहे.

देवस्थान ट्रस्टचे प्रकरण नेमके आहे काय

देवस्थानची देखभाल करणारे शेख सर यांच्या नावावर येथील देवस्थानची जमीन होती. कर्जत येथील लोकांचा शेख सरांवर विश्वास असल्याने आणि देवस्थानच्या पूजेची परंपरा त्यांच्या घरात असल्याने लोकांनी त्यांच्या ताब्यात देवस्थानचा सर्व व्यवहार ठेवला होता. कालांतराने शेख सरांचे निधन झाले आणि त्यांच्या मुलाच्या ताब्यात देवस्थानची देखभाल गेली. तर शेख सरांच्या चुलत भावाने शेख सरांच्या नावावर असणाऱ्या जमिनीवर आपला वारसा हक्क सांगितला आणि त्यानंतर तो वाद कोर्टात गेला. दरम्यानच्या काळात सचिन कुलते या माणसाने शेख सराच्या भावाच्या मदतीने देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी लोकांना आपली दुकाने थाटण्यास मदत केली. तसेच देवस्थानची जमीन शेख सरांच्या व्यक्तिगत नावे असल्याने सीलिंग कायद्यात जमीन जाऊ नये म्हणून त्यातील काही जमीन त्यांनी कर्जत मधील देसाई ,कुलते,बागल वकील यांच्या नावे केली त्या जमिनीचा वेगळाच वाद आहे.

वरील पार्श्वभूमीवर दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचा गुंता सोडवला जावा आणि देवस्थानची जमीन अतिक्रमणे हटवून जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानच्या स्वाधीन करावी यासाठी काल आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रसंगी  तौसिफ हमीम शेख यांनी पेटवून घेतल्याने आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.

कर्जतमध्ये तणाव आज पाळला कडकडीत बंद 

तोसिफ शेख यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने कर्जत मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेख यांच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झाल्याने कर्ज मध्ये आज बंद पळाला आहे. शहरातील दुकाने, आर्थिक व्यवहार बंद असल्याने शहरातल्या रस्त्यावर शुकशुकाट आहे. शाळा कॉलेज हि आज कडकडीत बंद असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवली आहे.